6 December Mahaparinirvan Din Status Dp Images
⬇ हे नक्की वाचा ⬇
अन्याय,अत्याचार,विषमतेच्या विरोधात स्वातंत्र्य, समता, बंधुतेची शिकवण देणारा सामाजिक न्यायाचा ज्वलंत निखारा आजच्या दिवशी शांत झाला.
बाबासाहेब कधीच स्वतः साठी व स्वतःच्या कुटुंबासाठी जगलेच नाहीत त्यांचे जिवन फक्त आणि फक्त समाज उद्धारासाठी, शोषित, दिन, दलित, बहुजन यांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी, त्यांना माणूस म्हणून जगवण्यासाठी होते.
बाबासाहेबांनी त्यांचा देह समाजासाठी झिजविला, बहुजनांचे आयुष्य समृद्ध केले. बाबासाहेबांनी जे काही महान कार्य केले आहे त्याची तुलनाच होऊ शकत नाही,बाबासाहेबांच्या कार्याला शब्दांच्या चौकटीत बसविणे अशक्यच आहे.बाबासाहेबांच्या जाण्यानं मानव जातीच्या इतिहासाला तसेच समानतेचे तत्व समाजात व्यापक स्वरूपात रुजवणाऱ्या युगाचा अंत झाला.बाबासाहेब गेले पण कित्येक बहुजनांचा वर्तमान व भविष्य घडवून गेलेत. बाबासाहेब जरी देह-शरीर रूपाने निघून गेले असतील तरी त्यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे विचार, त्यांची प्रेरणा कायम अजरामर राहील.

बाबा तुमच्या लेखनीने अखंड भारत देश घडत आहे बघा..! बाबा तुमच्या आठवणीने आज आभाळ सुद्धा रडत आहे.








